MaharashtraAssemblyUpdateLive : मोठी बातमी : थेट विधानसभेतून … : अजित पवार विरोधी पक्ष नेते , शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला असून विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठरावाविरोधात ९९ मते पडली तर तिघांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही.
अजित पवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड जाहीर
केंद्रानंतर काही राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता, महाराष्ट्र सरकार लवकरच याविषयी निर्णय घेईल : मुख्यमंत्री
सुरुवातीला मला मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं. नंतर कुणीतरी सांगितलं मी नको, उद्धव ठाकरेंना करा. मी काहीही बोललो नाही. मला सत्तेची हाव नाही. मात्र, नंतर निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
मी १७ वर्षांचा होतो, बाळासाहेबांच्या विचाराने मला वेडं केलं, तेव्हाच मी शिवसैनिक झालो, आनंद दिघे यांच्याशी भेट झाली, वयाच्या १८ व्या वर्षी शाखा प्रमुख झालो, वरिष्ठ असताना ही संधी मिळाली, १९९७ ला नगरसेवक झालो, पाच वर्ष आधीच होऊ शकलो असतो, पण तिथल्या कार्यकर्त्याला युतीत तिकीट देण्याचा निर्णय झाला, मी पदाची लालसा कधीच केली नाही, यानंतर कामाला सुरुवात केली ते मागे वळून पाहिलं नाही, कधीच कुटुंबाचा विचार केला नाही, आमचे बाप काढले, कुणी प्रेत म्हणालं, कुठल्या थराला चाललोय आपण, आम्ही एकही शब्द काढला नाही,
आम्हाला कुणीही विचारले नाही . मी खूप अस्वस्थ होतो अशी वागणूक मला मिळाली. कुठे चाललोय ? कुणी काहीही विचारले नाही. तरीही धडाधड आमदार माझ्या मागे आले. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही . माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात होता. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो तरी चालेल तरी माघार घेणार नाही . आता मी हा निर्णय घेतला.
देवेन्द्रजी मला म्हणाले, जगातील ३३ देशांनी महाराष्ट्रातील या इतिहासाची नोंद घेतली आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना भाजपचे सरकार आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवण्याचे धाडस केले याबद्दल माझ्यासोबत गेल्या १५ दिवसांपासून सोबत असणाऱ्या आमदारांना धन्यवाद देतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनंदन प्रस्तावाला उत्तर
एकनाथ शिंदेजी संघटना आणि सरकार यामधील फरक लक्षात ठेवा. सर्वाना सोबत घेऊन, समाधान करत सरकार चालवावं लागणार आहे असा सल्ला देताना ठाकूर म्हणाले कि , आमच्यावरही थोडा अन्याय केला त्यामुळे नाराजीही आहे. आम्ही लहान मोठे मिळून २९ पक्षाचे आमदार आहोत. म्हणून अशांत टापूकडे लक्ष द्या . एकनाथ शिंदे यांनी आपली संघटना वाढवण्यासाठी अनेकांना झटके दिले आहेत. आमचाही आमदार घेतला होता. कसं जमतं माहिती नाही. फडणवीसांनादेखील ही कला अवगत आहे. पण संघटना वाढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.
आ. हितेंद्र ठाकूर बोलत आहेत …
बहूमत चाचणीच्या वेळी एकूण २२ आमदार गैरहजर राहिले. यामध्ये जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या १० आमदारांचाही समावेश आहे.
अशोक चव्हाण : सभागृहात येण्यासाठी उशिर झाला यात आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कालच आम्ही अध्यक्षांच्या निवडणुकीत मविआचं समर्थन केलं आहे. आजही तिच भूमिका. आधी चर्चा होते मग मतदानाचा प्रस्ताव मांडला जातो अशी प्रथा आहे.
समाजवादीचे आमदार रईस शेख बोलत आहेत. त्यांचे अभिनंदन करतो पण आम्ही मतदानात सहभाग घेतला नाही. महाराष्ट्रातील सर्व जनतेला न्याय द्या . अल्पसंख्यांकांच्या प्रश्नाला ऐकले जाईल याची शास्वती मुख्यमंत्र्यांनी जनतेला देण्याची गरज आहे.
आम्ही बंड केले नाही . आम्ही उठाव केलाय : गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील बोलत आहेत. आम्ही बंड केलेले नाही. मला म्हणतात गुलाबराव तुम्हाला पुन्हा पानटपरीवर पाठवू. धीरूभाई अंबानी सुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत होते. अजित दादा तुम्ही आमच्या आमदारकीची काळजी करू नका. बंडखोरांच्या वतीने त्यांनी उत्तरे दिली. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत . भास्कर जाधव यांनी काळजी करण्याचे कारण नाही.
आमदार विनय कोरे बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांचा गौरव.
आज महाराष्ट्रातील जनतेचे सरकार आले आहे. ५० आमदारांना एकत्र आलात . हे सरकार शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. राज्यातील साडे तेरा कोटी लोकांसाठी हे सरकार काम करणार आहे. : मुनगंटीवार
काँग्रेस आणि शिवसेनेवर मुनगुंटीवार यांची तीव्र शब्दात टीका
फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही आग लावण्याचं काम करत आहात. तुम्हाला भाजपा समजलेलीच नाही. ज्यांना काही समजलेलं नाही त्यांच्या दु:ख भिंती ऐकत होत्या. सगळं आपल्याच कुटुंबात नेत आहेत. असेल हिंमत तर सांगा कुटुंबातील व्यक्तीला नाही देणार. कार्यकर्त्यांनी फक्त झेंडेच मिरवायचे का? अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केला.
मुखमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना सत्ता गेल्याची खदखद व्यक्त केली जात आहे. एक दिवस तुम्ही सत्तेविना राहू शकत नाहीत. हिंदुत्वाच्या विचारासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तुम्ही शब्द काय वापरता ? एकविरा देवीच्या मंदिरात काँग्रेससोबत जाणार नाही अशी शपथ घेतली होती , काय झाले त्या शपथेचे ?
सुधीर मुनगंटीवार बोलत आहेत …
ईडीची चौकशी लावून आमदारांना फोडण्याचे काम तुम्ही केलेत . संजय राठोड , प्रताप सरनाईक , यामिनी जाधव यांचा उल्लेख करीत शिंदे सरकारवर तुफान हल्ला केला. यावरून सभागृहात मोठा गोंधळ. मी बोललेलो तुम्हाला पटणार नाही. सगळ्या माणसांवर ईडी लावली आहे. ज्यांची चौकशी चालू असल्याने ज्यांनी पक्षांतर केले त्याची यादीच सभागृहात वाचून दाखवली तेंव्हा प्रचंड गोंधळ झाला. यामध्ये हस्तक्षेप करीत विधान सभा अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना नवे घेण्यापासून थांबवले. एकनाथ शिंदे आजही सांगतात कि , मी शिवसैनिक आहे . आनंद दिघे यांचा शिवसैनिक आहे. शिवसेना वाचविण्यासाठी निर्णय घ्या…
- महाराष्ट्रामध्ये महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे. भाऊ भावाच्या विरोधात उभा राहणार आहे. जे काही झाले ते आपल्या सर्वांच्या संमोर आहे. दिल्लीच्या तख्तासाठी महाराष्ट्रातले मराठे मरत आहे. तुमची प्रत्येक कृती महाराष्ट्रातले सरकार उलथून टाकण्यासाठी दिसत होती. कोरोना काळातही तुम्ही सत्ता बदलण्याचे प्रयत्न चालू होते परंतु सत्ता उलटली गेली नाही. एकनाथराव मी तुमचे अभिनंदन करतो.
शिवसेनेकडून भास्कर जाधव बोलत आहेत…
देवेंद्र फडणवीस असे येतील असे वाटले नव्हते – बाळासाहेब थोरात
तुम्ही शपथ घेताच काम सुरु केले हि चांगली गोष्ट नाही. आरेच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेतला तसा शेतकऱ्यांच्या बाबतीतही निर्णय घ्या. मॉन्सून होऊन महिना झाला तरीही धरणात पाणी नाही , पावसामुळे पेरणी झालेली नाही हे सगळे प्रश्न चिंताजनक आहेत. म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे कि , जनतेचे तातडीचे निर्णय सोडवा. राज्याच्या पीक पाण्याची परिस्थिती यावर पहिली बैठक घेण्याची विनंती बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
एक पक्षाचे सरकार असले तरी अडचणी येत असतात. आमच्यासमोरही खूप अडचणी होत्या , तणाव होता पण आम्ही एकमेकांना सांभाळून घेतले. एकाच गोष्टीचे वाईट वाटते. ज्या पद्धतीने घटना घडल्या त्याचा इतिहास लिहिला जाईल. या आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली हे योग्य झाले नाही. जनतेला सगळे माहित आहे.
शिवसेनेच्या पुढाकाराने महाविकास आघाडी स्थापन झाली. आम्हाला जे काही करता येईल ते केले. कोरोना काळातील सरकारच्या कामाचा जागतिक स्तरावर गौरव झाला. लोकशाहीने, राज्यघटनेने सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्वाला सर्वोच्च स्थानावर नेले हे नाकारता येणार नाही. राज्यघटना त्यामुळेच आदर आणि श्रद्धास्थानी असली पाहिजे असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस असे येतील असे वाटले नव्हते असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात बोलता आहेत
अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी …
रिक्षा चालकापासून इथपर्यंत पोहोचणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही, पण हे सगळे होत असताना उद्धव ठाकरेंना विश्वासात घेऊन हे काम केले असते तर अधिक चांगले झाले असते.
आम्ही कुणावरही निधी वाटपाच्या बाबतीत अन्याय केला नाही. हा संदेश यानिमित्ताने जावा हि अपेक्षा आहे. बऱ्याच गोष्टी न्यायालयात आहेत म्हणून त्यावर आता बोलत नाही. ११ तारखेपर्यंत थांबायला हवे होते पण राज्यपालांनी सक्रिय होत तातडीने निर्णय घेतले. आम्ही सगळे विनंती करीत असतानाही आम्हाला अध्यक्ष निवडीसाठी परवानगी दिली नाही. सरकारने मान्यतेसाठी पाठवलेली विधान परिषदेच्या १२ आमदारांची यादीही मंजूर केली नाही. हे कसं विसरता येईल ?
सातत्याने एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसैनिक , शिवसैनिक म्हणून का करत आहात ? राज्यपाल खूपच ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.
उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यावर आमदार नाचले हे ठीक आहे पण टेबलवर चढून नाचले हे बरोबर नाही . तुम्हाला तुमच्या मतदार संघातले मतदार पाहत असतात असे बोलताना अजित पवार यांनी शहाजी बापू यांच्या काय डोंगर, काय झाडी , काय हॉटेल, सगळं ओके ओके …असं म्हणालात ….उद्या हे मोठे लोक काय निर्णय घेतील हे तुम्हाला समजणारही नाही.
अजित पवार यांची सभागृहात तुफान फटकेबाजी चालू आहे . अजित पवार म्हणाले कि , “देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी बारकाईने ऐकलं. तुम्ही एकनाथ शिंदेंचं इतकं समर्थन करत होता. मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रीमंडळात होते तेव्हा फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं. नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे. ज्याचं वजन असतं, भारदस्त असतो त्याच्याकडे अधिक खाती असतात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अनेक खाती होती.”
Maharashtra CM Eknath Shinde wins the trust vote by a 164-99 margin, 3 members abstained from voting. pic.twitter.com/ZbaM54n1fd
— ANI (@ANI) July 4, 2022
थेट विधानसभेतून …
- यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि , अनेकांनी मी उपमुख्यमंत्री झालो म्हणून टीका केली. पण पक्षानं आदेश दिला आणि मी त्याचं पालन केलं. खरंतर पक्षानं मला उपमुख्यमंत्री काय, जर घरी बसण्याचा आदेश जरी दिला असता तरी मी तो मान्य केला असता. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की मी एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी मी पूर्ण ताकदीनं उभा आहे. त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा दिसणार नाही. कुरघोडीचं राजकारण दिसणार नाही. आमच्यातली मैत्री नेहमी कायम राहील.
Our alliance had received the mandate but we were deliberately taken away from the majority. But with Eknath Shinde, we have once again formed our Govt with Shiv Sena. A true Shivsainik has been made the CM. I became the Deputy CM as per my party's command: Maharashtra Deputy CM pic.twitter.com/FCzkzWpWVs
— ANI (@ANI) July 4, 2022
-
येत्या काळामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ते काम करतील याचा मला विश्वास आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले आणि कर्मावर निष्ठा असलेले एकनाथ शिंदे आहेत. जे संघटक आणि जनतेचे सेवेकरी आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांच्या प्रभावामुळे ८० च्या दशकामध्ये त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम सुरू केलं. एक साधा कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मुख्यमंत्री झालेत. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर शाखा प्रमुख म्हणून निवड केली. या नंतर दिघे साहेबांच्या नेतृत्त्वात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. सामान्याला न्याय देण्यासाठी ते आंदोलन करायचे. अनेक केसेस घेतल्या, तुरुंगात गेले. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी जनसेवा केली.
– एकनाथ शिंदे २४ तास काम करणारा माणूस असून दिवसाला ४०० ते ५०० लोकांना भेटल्याशिवाय एकनाथ शिंदेंचा दिवस जात नाही- देवेंद्र फडणवीस
– शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात देवेंद्र फडणवीस भाषण करत आहेत. शिंदेंच्या आजवरच्या प्रवासाची आठवण फडणवीस यांनी करुन देत आहेत.
-
शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात ९९ मतं पडली आणि १६४ मतांच्या बहुमतानं शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. ३ सदस्य मतदानापासून दूर राहिले.
Eknath Shinde-led govt reaches the majority mark of 144 in the Maharashtra Assembly, head count still going on. pic.twitter.com/4Gsh2PdTxQ
— ANI (@ANI) July 4, 2022