Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : शिंदे गटाच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना आणि शिवसेनेतून फुटून स्वतःचा गट तयार करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेने आता कायद्याची लढाई सुरु केली आहे . शिंदे गटाच्या व्हीपला शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता देण्याच्या नवनियुक्त महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या कृतीला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे . सुप्रीम कोर्टाने त्यांची हि याचिका स्वीकारली असून या प्रकरणाची सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली असल्याचे वृत्त आहे.

काल महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी मतदान झाले. या निवडणुकीत शिंदे – भाजप गटाचे उमेदवार राहूल नार्वेकर विजयी झाले. दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याच्या संबंधाने व्हिप जारी  करण्यात आला होता परंतु शिंदे गटाच्या ३९ आमदारांनी शिवसेनेचा अधिकृत व्हिप झुगारून बंडखोर गटाने भाजपच्या उमेदवाराला मतदान केले . या सर्व बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी म्हणून शिवसेनेच्यावतीने विधानसभेच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे परंतु विधी मंडळाच्या सचिवालयाने काल रात्री एक पत्र  जारी करून त्यात शिवसेनेच्या गट नेत्याची आणि प्रतोदची नियुक्ती रद्दबातल केली आहे. तसेच शिंदे गटाच्या गटनेते पदाला आणि प्रतोद पदाला मान्यता दिली आहे.

दरम्यान या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून हि याचिका न्यायालयाने सुनावणीसाठी घेतली आहे. या याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या आधीच्या प्रकरणाची सुनावणीची याच दिवशी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!