Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : शिवसेनेच्या चिंता मिटेनात …आणखी एक जवळचा नेता फडणवीस -शिंदेंच्या संपर्कात …!!

Spread the love

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मोठे बंड केल्यानंतरही शिवसेनेची पडझड चालूच आहे. या निमित्ताने एकामागून एक धक्के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना बसत आहेत. शिवसेनेच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे पूत्र खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेच्या ३९ आमदारांनी हिंदुत्वाचा मुद्द्यावर भाजपला सोबत घेत सरकार बनविल्यानंतर हिंगोलीचे आमदार बांगर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे याच आमदाराने फुटीर शिवसैनिकांनी परत यावे म्हणून हंबरडा फोडला होता. या बंडामुळे सरकार तर गेलेच पण शिवसेनेमध्येही उभी फूट पडली आहे. दरम्यान शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर आता जिल्हा स्तरावरील शिवसेनेमध्ये त्यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक असे गट पडताना दिसत आहेत.

फडणवीस -शिंदे यांच्याशी भेट चर्चा …

याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर हेही आता वेगळा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नार्वेकरांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर  त्यांनी एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही तासभर चर्चा झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे हे तेच नार्वेकर आहेत ज्यांना  एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर मध्यस्थीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांच्या मध्यस्थील यश आले नव्हते. त्यानंतर मात्र या सर्व राजकीय घडामोडीतून स्वतःला वेगळे केले होते. त्यांच्या या कृतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अशी उघड झाली बातमी …

त्याचे असे झाले कि , विधानसभेच्या सभागृहात राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना राहुल नार्वेकर यांच्याऐवजी त्यांनी मिलिंद नार्वेकर यांचा उल्लेख केला. सभागृहातील सदस्यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. मात्र तेव्हा विधानभवनाच्या लॉबीत आदित्य ठाकरे भेटले होते. त्यांनी मी जेव्हा फडणवीसांची भेट घेतली तेव्हा मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याचे सांगितले आणि हि बातमी फुटली.

आदित्य वागलात शिंदे गटाची शिवसेना आमदारांना अपात्रतेची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आहेत. शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत दोन गट पडलेत. त्यात एक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट झाला आहे. त्यात १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत. विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडली. तर यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने विरोधात मतदान केले. त्यामुळे आदित्य ठाकरे वगळता इतर १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून बजावण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!