AurangabadCrimeUpdate : गेले होते एकाला अटक करायला सापडला मोठा भाऊ …

औरंगाबाद : गुन्हेशाखेला अपेक्षित असलेला चोरटा पकडण्यासाठी पथक श्रीरामपुरात गेले असतांना जवाहरनगर पोलिसांना वॉंटेड असलेला त्याचा मोठा भाऊही अलगद जाळ्यात आला. सचिन टाके असे अटक आरोपीचे नाव आहे.
वरील प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वा. जवाहरकॉलनीतील प्रभात नगरात गुन्हे शाखेने आज अटक केलेला आरोपी सचिन टाके व राजेंद्र चव्हाण यांनी मयूरबन कॉलनीतील पूजा प्रवीण हजारे (३९) यांचे हळदी कुंकवाला जातांना १ लाख ५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. हा गुन्हा जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पीएसआय वसंत शेळके यांनी पोलीस निरीक्षक संतोष पाटीलं यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मार्च रोजी उघडकीस यात राजेंद्र चव्हाण याला अटक केली होती. तर सचिन टाके हा फरार होता
एका आठवड्यापूर्वी शहरात पंधरा मिनिटाच्या अंतरात दोन मंगळसूत्र चोऱ्या करणारा चोरटा गुन्हेशाखेने निष्पन्न केला आहे त्याचेनाव स्वप्नही टाके असून तो सचिन टाकेचा सखा लहान भाऊ आहे.याने १२ जून रोजी महाजन कॉलनीत कमळ अंबादास कुलकर्णी (८०) या निवृत्त सकाळी ७.३० वा शिक्षिकेचे दीड टोळ्यांचे गंठण हिसकावून मोटरसायकल वर बन्सीलाल नगरात विष्णुदास बजाज (६२) यांची दोन टोळ्यांची चैन हिसकावली.
वरील दोन्ही प्रकरणात अनुक्रमे मुकुंदवाडी, व वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . गुन्हा घडला त्या दिवशीच गुन्हेशाखेने ४५ कि.मी पर्यंत चोरट्यांचा माग काढला होता. त्यांनतर चोरटा आहे त्याला पकडण्यासाठी गुन्हेशाखेचे पीएसआय कल्याण शेळके हे पथकासहित श्रीरामपुरात असतांना कुख्यात सचिन टाके सापडला , वरील कारवाई पोलीस आयुक्त डॉ, निखिल गुप्ता , पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्य्क पोलीस आयुक्त विशाल ढुमे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे, एपीआय काशिनाथ महांडुले, पीएसआय अजित दगडखैर,पोलीस कर्मचारी राजेंद्र साळुंके, संजय राजपूत यांनी पार पाडली