AurangabadCrimeUpdate : दोन महिन्यापूर्वीच्या बलात्कार प्रकरणात सावत्र आईलाही अटक , कुकर्म करताना भावाला केली होती मदत !!

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक असलेल्या आरोपीच्या बहीणीचाही समावेश गुन्ह्यात असल्याचे उस्मानपुरा पोलिसांच्या तपासात उघंड झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला आज अटक केली आहे.
हिना आसिफ शहा (२८) रा.उस्मानपुरा असे अटक महिलेचे नाव आहे.पिडीता ही हिना ची सावत्र मुलगी आहे.
२५एप्रिल रोजी रमजानसाठी बहीणीकडे आलेल्या भावाने सतत तीन दिवस १३वर्षाच्या भाचीचे लैंगिक शोषण करंत पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पोक्सो व बलात्काराचा गुन्हा आरोपी मामाच्या विरोधात दाखल झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी पिडीतेचा मामा आरेफ शहा(३५)रा.कटकटगेट याला अटक केली होती.आरोपी आरेफ शहा सध्या हर्सूल कारागृहात शिक्षा भोगतोय.
दरम्यान पिडीतेला त्रास होत असल्यामुळे आईने विचारताच खरा प्रकार उघडकीस आला होता पण या प्रकरणात पिडीत मुलीच्या सावत्र आईचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघंड झालेले आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय गायकवाड तपास करंत आहेत.