AurangabadCrimeUpdate : पत्नीचा खून करून त्याने स्वतःच पोलिसांना फोन केला …

औरंगाबाद – आज दुपारी अडीच वा. बायकोचा खून करुन पोलिस नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतला. मधुरा बालाजी लोणीकर(२२)रा.भानुदासनगरअसे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. आरोपी बालाजी लोणीकरला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून वृत्त हाती येई पर्यंत अटकेची प्रक्रिया सुरुहोती. आरोपी बालाजी वैजनाथ लोणीकर हा गेल्या ५वर्षांपासून शहरात भानुदासनगर मधे राहात आहे.
शहरातील संजय प्लास्टो मधे तो चालक म्हणून काम करतो.बालाजी लोणीकर आणि मधुरा ला एक ४ वर्षाचा मुलगा आहे. आरोपीचे वडील वैजनाथ लोणीकर हे परळी येथे राहतात.
पोलिस तपासात उघंड झालेल्या माहिती नुसार, गेल्या ५वर्षांपासून बालाजी हा त्याची पत्नी मधुराच्या चारात्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच त्यांचे कडाक्याचे भांडण व्हायचे आज दुपारी दोन वा. भांडण झाल्यावर आरोपी बालाजी ने उशीने तोंड दाबून मधुरा चा खून केला. व पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले. पोलिस नियंत्रण कक्षाने जवाहरनग पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी आरोपी बालाजी ला घरुन ताब्यात घेतले.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलिस करंत आहेत.