Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LPGGasNewsUpdate : बोंबला : घरातला एलपीजी गॅस पुन्हा महागला …आणि राजकीय नेते मश्गुल धर्माच्या राजकारणात …

Spread the love

नवी दिल्ली : एकीकडे देशातील नागरिक आधीच महागाईने त्रस्त होत आहेत तर दुसरीकडे राजकीय पक्षांचे धर्मावरून राजकारण चालू आहे . या पार्श्वभूमीवर आज शनिवारी 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत 14.2 किलोग्रॅम डॉमेस्टिक LPG सिलेंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल -डिझेलच्या दराबरोबरच खाण्या -पिण्याच्या सर्वच वस्तूंच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून बँकांच्या कर्जाच्या व्याज दरातही वाढ झाली असल्याने लोकांचे जगणे महाग झाले आहे. औषधांच्या  किमतीमध्येही वाढ झाली आहे . असे असताना राजकारणी मात्र धर्माच्या चर्चा करण्यात आणि एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात मश्गुल आहेत . जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आवाज उठवायला कोणीही तयार नाही  आणि सरकारकडूनही दिलासा मिळत नाही  अशी अवस्था आहे.

विशेष म्हणजे गेल्या वेळी 22 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाली होती. तर एप्रिलमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. एका आठवड्यापूर्वी 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या किमती लागू झाल्यानंतर दिल्लीत 1 मेपासून 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती 2253 रुपयांवरुन 2355.50 रुपये झाल्या. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात उर्जेची मागणी वाढते आहे. परंतु मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याने गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!