Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabaNewsUpdate : पेट्रोल कमी भरल्याचा वाद खुनाचा प्रयत्न, तीन अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – सेव्हनहिल परिसरातील जागृत पेट्रोलपंपावर काल रात्री ९.३०च्या सुमारास मोटरसायकल मधे कमी पेट्रोल टाकण्याच्या कारणावरुन पेट्रोलपंप कर्मचार्‍याचा खून करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना पुंडलिकनगर पोलिसांनी आज अटक केली.

Advertisements

या प्रकरणात शेख अफसर शेख रज्जाक (२४), सुलेमान बबन पटेल (५५), मुजबिल सुलेमान पटेल (१७) सर्व रा.इंदीरानगर यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी पेट्रोल कमी भरल्याचा वादातून  पेट्रोलपंप कर्मचारी योगेश याच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच डोक्यावर चाकुचे वार केले. दरम्यान भांडण झाल्यानंतर योगेशची आई घटनास्थळी पोहोचली त्यांचाही विनयभंग जमावाने केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.

Advertisements
Advertisements

घटना घडल्यानंतर पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे, सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी सोबंत आणखी ७ इसम होते. त्यांचीही माहिती पोलिसांनी मिळाली पण ते फरार असल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले.फरार आरोपींमधे अब्रार मकसूद पटेल, जमील सुलेमान,तौफिक शेख, शेख शाहरुख वजीर,सोहेलशेख आयुबशेख,शोएब मोह्हमद शरीफ खान,रायडर सर्व रा.इंदीरानगर यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पुढील तपास एपीआय शेषराव खटाने करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!