AurangabadNewsUpdate : आत्महत्येच्या दोन घटना , एकाचा गळफास तर एकीने मारली रेल्वेसमोर उडी

औरंगाबाद – क्षहरात आज दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद क्रांतीचौक व दौलताबाद पोलिसांनी घेतली आहे. रोहन झामा पाटील (२४) रा.वडगाण रावेर जि.जळगाव हल्ली.मु समर्थनगर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पहाटे तीन वा. आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले. त्याने सिलींग फॅनला बाॅक्स पॅकींग च्या पट्टीने गळफास घेतला . मयत हा माणिकचंद पहाडे माहाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
तर दुसऱ्या एका घटनेत मिटमिटा येथील फुड टेक्नाॅलाॅजी महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीने आज दुपारी दीडच्या सुमारास शरणापूर फाट्याजवळील रेल्वेपटरीवर रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली. शेख मसरत रियाजोद्दीन शेख(२३) रा, नायगाव नांदेड हल्ली.मु.मिटमिटा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे . दरम्यान तिच्या आत्महत्येबद्दल पोलिसांनी तिच्या पालकांना माहिती दिली. वृत्त हाती येई पर्यंत पालक शहरात पोहोचले नव्हते. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद घेतली आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे व पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करंत आहेत.