SolapurNewsUpdate : ट्रकवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात एक वर्षाच्या चिमुरडीसह ४ ठार ४ जखमी

सोलापूर : सोलापुरातील मार्केट यार्ड जवळ थांबलेल्या ट्रकवर भरधाव इनोव्हा कारने जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक वर्षाच्या बाळासह ४ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सोलापूर – हैदराबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठा भीषण अपघात झाला आहे. एक मालवाहू ट्रकला इनोव्हा कारने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या धडकेत इनोव्हा कारचा चेंदामेंदा झाला आहे. दोन क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बघ्यांना हटवण्याचे काम जोरात सुरू आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सचिन शितोळे (वय-३५ वर्ष) दिलीप जाधव (३५वर्ष)सोनाबाई जाधव (५५ वर्ष), लाडू जाधव १ वर्ष तर ७ वर्षांची गौरी जाधव यांचा समावेश आहे. तर वर्षा सचिन शितोळे, रेखा दिलीप जाधव, इशा जाधव आणि विनायक घोरपडे हे जखमी झाले आहे.