AurangabadNewsUpdate : नायट्रोसन ची विक्री करणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात

औरंगाबाद : नायट्रोसन या नशेसाठी वापरल्या जाणार्या शहरात मुंबईहून येत विक्री करणार्या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला गुन्हेशाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत सापळा लावून माळीवाडा भागातून मुद्देमालासहित पकडले.या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविंद्र लक्ष्मण साठे (२६) रा.कुर्ला पश्र्चिम साकीनाका असे अटक आरोपीचे नाव आहे.
साकीनाका पोलिसांच्या रेकाॅर्डवरचा हा गुन्हेगार असून शहरात गेल्या दोन वर्षांपासून तो नायट्रोसन या गोळ्यांची माळीवाडा भागात येऊन विक्री करत होता.पीएसआय कल्याण शेळके यांना खबर्याकडून साठेची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून मुद्देमालासह अटक करण्यात आली.वरील कारवाई पीएसआय कल्याण शेळके एएसआय रमाकांत पाटारे,पोलिस कर्मचारी नितीन देशमुख अनिता त्रिभूवन, संदीप खरात यांनी पार पाडली.