Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : जुगार्‍याचा ‘एसीबी’ ला हाताशी धरुन ‘ट्रॅप’ ,पोलिस फरार

Spread the love

औरंगाबाद : वाळूज पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍याला जुगार्‍याने एसीबी ला हाताशी धरुन ट्रॅप घडवला.असा आरोप वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी केला. मोहम्मद सलीम हैदर शेख(३२) धंदा पोलिस नाईक वाळूज पोलिस ठाणे. हा ट्रॅप झाल्यानंतर एसीबी अधिकार्‍यांच्या हाती न लागता पळून गेला.एसीबी ट्रॅप मधील फिर्यादी सादिक शेख(३२) हा अनेक वर्षांपासून तुर्काबाद खराडी परिसरात जुगार अड्डा चालवतो.

दरम्यान पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता शहरात आल्यानंतर वाळूज पोलिस निरीक्षकांनी हा अड्डा बंद केला हौता.तरीही सादिक शेख याने मोठ्या धाडसाने सुरु ठेवत होता. म्हणून २एप्रिल ला त्याचे सर्व साहित्य जप्त करंत त्याला पोलिस अधिकार्‍यांनी चांगला चोपही दिला होता. तरीही ७एप्रिल रोजी त्याने पुन्हा अड्डा सुरु करताच त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला.म्हणून चिडलेल्या सादिक त्याचा पोलिस असलेला मित्र मोहम्मद सलीम हैदर शेख ला सहज भेटायला बोलावले व ट्रॅप घडवून आणला. या प्रकरणी पोलिस अधिक्षक राहूल खाडे यांनी खुलासा केला की, वरिष्ड पोलिस अधिकार्‍यांना काही शंका होती तर माझ्याशी संपर्क करायचा होता.तसेच एसीबी कोणताही पुरावा असल्याशिवाय कारवाई करंत नाही. आणि आरोपी पोलिस एवढाच निर्दोष असल्याची खात्री होती.तर त्याने कारवाईच्या वेळेस त्या ठिकाणाहून पळ काढायचा नव्हता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!