बेकायदेशीर पिस्तूल पुरविणारा आंतरराज्य पिस्तूल तस्कर मन्या उर्फ राजू भाई पोलसांच्या जाळ्यात

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात बेकायदेशीर पिस्तूल पुरविणारा आंतरराज्य पिस्तूल तस्करतडीपार आरोपी मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या उर्फ राजू भाई याला पोलिसांनी पहाटे अटक केली.
रविवारी पहाटे हॉटेल स्कायलार्क येथे शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. मन्या नागोरीची कारागृहातून पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार होता. गेल्या चार दिवसांपूर्वी पोलिसांनी चंदगड येथून चार पिस्तूलासह काडतुसे जप्त केली होती. हा शस्त्रसाठादेखील त्यानेच पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती समोर येत आहे. मन्या नागोरीकडून आणखी काही शस्त्रे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. रविवारी दुपारी त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.