MarathwadaAccidentUpdate : दोन मोटारसायकल स्वारांना बसने चिरडले, तीन जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणाजवळ बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन या अपघातात तिघेजण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून जवळच असलेल्या सिगटाळा पाटीजवळ हा अपघात घडला. हे मोटारसायकलस्वार सेलूकडे जात असताना जिंतूर आगाराची बस जिंतूरकडे जात असताना हि दोन्हीही वाहने समोरासमोर आल्याने हा अपघात झाला.
चारठाणा येथून जवळ असलेल्या सिंगठाला पाटीवर एसटी बस चालकाने चुकीच्या दिशेने गाडी चालवीत दोन मोटार सायकलांना उडवित जागेवरून बस चालक पसार झाला. या अपघाताची अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी 7. 15 च्या सुमारास सेलू तालुक्यातील राज मोहल्ला येथील पाच व्यक्ती दोन मोटारसायकल वर एलदरी येथून मोटारसायकल क्रमांक MH 21AJ 6256 व MH22 W 9770 या गाड्यांवर सेलूकडे गावी जात असताना जिंतूर आगाराची बस क्रमांक MH 13 CU 6921 औरंगाबाद वरून जिंतूर कडे जाणाऱ्या एसटी बसने त्या दोन मोटार सायकल स्वारांना चुकीच्या दिशेने गाडी चालवत कट मारून सुमारे पन्नास फूट फरफटत नेले आणि बस चालक बस जागेवरच सोडून पसार झाला.
दरम्यान या घटनेची माहिती चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रुग्णवाहिका चालक शेख इस्कोद्दीन व गावातील नागरिक आरेफ कुरेशी, गफार मुल्ला, तारेख देशमुख ,तालेब कुरेशी यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना जिंतूर येथे हलविण्यात आले. शेख वसीम शेख खयूम यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात अतिक रफिक तामटकरी, वय 20 वर्षे , शेख अमीर शेख नजीर , वय 18 वर्षे, शेख मोहजीब शेख खालेद , वय 20 वर्षे सर्व राहणार राज मोहल्ला सेलू हे तीन तरुण जागेवरच ठार झाले असून शेख वसीम शेख खयूम वय 30 वर्षे ,शेख विखार अब्दुल रशीद वय 30 वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत, असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. चारठाना पोलीस अधिक तपास करीत आहे.