AurangabadAccidentNewsUpdate : कार अपघातात तरुण ठार , तिघे बचावले

औरंगाबाद – आज संध्याकाळी ५.१५ वा. माळीवाडा जवळ केडीआर फार्म हाऊस समोर देऊळगाव राजाहून येणाऱ्या एर्टिगा कारच्या झालेल्या अपघातात चौघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला.
सुजल प्रवीण रोडे(१८) रा. देऊळगावराजा असे मयताचे नाव आहे. तो शिक्षण घेत होता त्याच्या सोबत त्याचे दोन मित्र शिवम अनिल मुडसिंगे, वय १८, रा. देऊळगाव राजा, केतन विजय तिडके, वय १८ रा. देऊळगाव राजा आणि वेदिक केणेकर , रा. आव्हाना , ता. भोकरदन जि . जालना असे तिघे जण या अपघातातून बचावले आहेत.
पोलिसांच्या माहिती नुसार वरील तिन्ही मित्र देवदर्शनासाठी खुलताबादला जात होते. माळीवाडा जवळ कारचे नियंत्रण सुटले व कार तीनदा रस्त्यावर पलटी झाली. या मध्ये सुजल रोडे जागीच ठार झाला . दौलताबाद पोलिस निरीक्षक राजश्री आडे, पीएसआय रवी कदम यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही घाटी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी सुजल रोडे ला तपासून मयत घोषित केले वृत्त हाती येईपर्यँत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुटू होती.