Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : ‘नशेच्या गोळ्या’ म्हणून बेकायदा औषध विक्री करणारा गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद :  मेडिकल डिस्ट्रीब्युटरकडे काम करणाऱ्या इसमाने नशेच्या गोळ्या म्हणून अल्ट्रायकेट ,लॉराजपाम,कोडीस्टार सिरप असा साठा मोटरसायकलवर घेऊन फिरणाऱ्या इसमाला अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शानाखाली उस्मानपुरा पोलिसांनी प्रतापनगर मधील मोकळ्या मैदानात ३१ जानेवारी रोजी रात्री ९. च्या सुमारास अटक केली. त्याच्या ताब्यातून मोटर्ससायकल, व अंदाजे ५ हजार रु. च्या औषधी गोळ्या जप्त केल्या.

Advertisements

तौफिक रफिक फारुकी(४१)रा. ब्रिजवाडी नारेगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध निरीक्षक जीवन दत्तात्रेय जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वरील औषधी ड्रग्स म्हणून काही ठिकाणी वापरली जातात त्यानुसार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कारवाई पार पाडली. पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वाघ, अब्दुल, योगेश गुपता, पोलीस कर्मचारी सतीश जाधव अश्रफ सय्य्यद यांनी पार पाडली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!