AurangabadCrimeUpdate : लग्नाचे आमिष दाखवून करीत होता शोषण , कोर्टाच्या दणक्याने गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद- गेल्या सात वर्षांपासून पतीपासून विभक्त राहणा ऱ्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवत दिल्ली , आग्रा, जालना, कुंभेफळ या ठिकाणी नेत रेडीमेड कापड विक्रेत्याने शोषण केले व लग्नाची वेळ येताच कुटुंबीयांनी आरोपीला फरार केल्यांनतर पीडितेने कोर्टाच्या आदेशाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देताच आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

विकास जनेशवर नायक(३१) रा. खेडीतगान जी. मुजफ्फरनगर उत्तरप्रदेश हल्ले. मु, जयभवानीनगर मुकुंदवाडी असे फरार आरोपीचे नाव आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत शोषण केल्यानंतर १६ जुलै २०२१ रोजी कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला तो अद्याप परतला नाही. म्हणून पीडितेने आरोपीच्या कुटनबियांना विचारणा केली असता कुटुंबीयांनी मारहाण करत पीडितेला हाकलून दिले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन मिरधे पुढील तपास करत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!