AurangabadNewsUpdate : खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे आज सरन्यायधिशांच्या हस्ते उदघाटन

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन भारताचे सरन्यायधीश व्ही.रमणा यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १०.३० वाजता होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरेन रिजीजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या.उदय ललीत, डी.वाय. चंद्रचूड, न्या.बी. आर . गवई , न्या.ए.एस.ओक यांची विशेष उपस्थिती राहील. उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दिपांकर दत्ता या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार असून राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचीही यावेळी विशेष उपस्थित राहील. आनंद यावलकर , निबंधक , औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक सामान्य एम डब्ल्यू चांदवाणी हे या सोहळ्याचे संयोजक आहेत.
औरंगाबाद उच्च न्यायालय विस्तार इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रसारण सकाळी सकाळी ९.१५ वाजल्यापासून
https://bit.ly/inaugural-function-hcaur
या लिंकवर पाहता येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दि . २३ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
सकाळी ९.०५ वा: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
सकाळी ९.२० वा : मा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची विस्तारीत इमारत, सिडको येथे आगमन व राखीव
सकाळी ९.४० वा: मा न्या. श्री एन.व्ही.रमण्णा, भारताचे मुख्य न्यायाधीश यांचे आगमन
सकाळी ९.४५ वा: Inauguration of B & C wings ko new high Court Annex building of Bombay high court bench at Aurangzeb
सकाळी ११:४० वा: राखीव
दुपारी १२:४० वा: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
दुपारी १२:४५ वा: विमानाने मुंबईकडे प्रयाण