CoronaMaharashtraUpdate : राज्यात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ७४४

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात १ हजार ७४४ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, १ हजार ६३२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर ४० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३२,१३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

Advertisements

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९९,८५० झाली आहे. तर, राज्यात आजापर्यंत १३९९६५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१६,२६,२९९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९९,८५० (१०.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९८,९५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २४,१३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!