Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे आज सरन्यायधिशांच्या हस्ते उदघाटन

Spread the love

औरंगाबाद :  औरंगाबाद  खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन भारताचे सरन्यायधीश व्ही.रमणा यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १०.३० वाजता होत आहे.  यावेळी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,  केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरेन रिजीजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या.उदय ललीत,  डी.वाय. चंद्रचूड, न्या.बी. आर . गवई , न्या.ए.एस.ओक यांची विशेष उपस्थिती राहील.  उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दिपांकर दत्ता या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार असून  राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचीही यावेळी विशेष उपस्थित राहील. आनंद यावलकर , निबंधक , औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक सामान्य एम डब्ल्यू चांदवाणी हे या सोहळ्याचे संयोजक आहेत.

औरंगाबाद उच्च न्यायालय विस्तार इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रसारण सकाळी  सकाळी ९.१५ वाजल्यापासून

https://bit.ly/inaugural-function-hcaur

या लिंकवर पाहता येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दि . २३ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.

सकाळी ९.०५  वा: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
सकाळी ९.२० वा : मा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची विस्तारीत इमारत, सिडको येथे आगमन व राखीव
सकाळी ९.४० वा: मा न्या. श्री एन.व्ही.रमण्णा, भारताचे मुख्य न्यायाधीश यांचे आगमन
सकाळी ९.४५ वा: Inauguration of B & C wings ko new high Court Annex building of Bombay high court bench at Aurangzeb

सकाळी ११:४० वा: राखीव

दुपारी १२:४० वा: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
दुपारी १२:४५ वा: विमानाने मुंबईकडे प्रयाण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!