AurangabadNewsUpdate : सातव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

औरंगाबाद- शहानुरमिया दर्गा परिसरात सातव्या मजल्यावर काम करणाऱ्या बांधकाम मजुराचा तोल गेल्याने काहली पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.१२ रोजी सकाळी आठ वाजता घडली. राजू काशिनाथ राठोड वय ४५ र.जय भवानी नगर असे मयताचे नाव आहे.राजू हा बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होता.
शहानूरमियाँ दर्गा येथे काँट्रक्टर बगाडीया यांनी घेतलेल्या इमारतीच्या कामावर राजू हे मिस्त्री काम करत होते.सकाळी आठ वाजता त्यांचा अचानक तोल गेल्याने ते सातव्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या आवाजाने इतर कामगार त्यांना वाचवण्यासाठी धावले परंतु राजू यांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राजूला एक दोन मुली असून एका मुलीचा विवाह झाला आहे.
कंत्राटदार जबाबदार – मयताचे नातेवाईक
घरातील करता माणूस गेला आहे.आता त्यांची मुलं उन्हात पडली आहे.हे सगळं एका कंत्राटदाराच्या हलगर्जी पणामुळे झालं आहे.कंत्राटदाराने कामगारांना सेफ्टी किट दिली नसल्याने आमच्या भावाचा जीव गेल्याने आम्ही कंत्रादारांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे मयताचा भाऊ बबन काशिनाथ राठोड यांनी सांगितले.