AurangabadCrimeUpdate : विधवेशी जवळीक साधत अंदाजे ५ लाखांना गंडवले, आरोपी अटकेत

औरंगाबाद – आई वडिल नसल्याची थाप मारंत विधवेशी जवळीक साधत युपीएससी परिक्षेसाठी दिल्लीला जाण्याचे कारण सांगत, लग्नाचे अमीष दाखवत अंदाजे ५ लाख रुपयांना गंडवणार्या भामट्याला वाळूज औद्योगिक पोलिसांनी अटक केली.
श्रीकांत विक्रम इंगोले (अंदाजे ३२)रा.सावरगाव बंगला हिंगोली असे अटक आरोपीचे नाव आहे. २०१५साली रांजणगाव परिसरात एकाच कंपनीत काम करणार्या विधवेशी आई ,वडिल नसल्याची थाप मारुन जवळीक साधली.आरोपी श्रीकांत इंगोलेने पिडीत महिलेकडून हार्णियाची शस्रक्रिया व टि.बी. वरील उपचार करवून घेतले. त्यामुळे आरोपी पिडीतेसोबतच राहू लागला. तिचा विश्वास बसल्यावर तिच्याकडून दिल्लीला जाऊन युपीएससी चे क्लास करण्यासाठी ३ लाख रु.घेत दिल्लीला जाऊन आला. व नंतर अकोला जिल्ह्यातील मुलीशी लग्न केले. हा प्रकार पिडीतेला सहन न झाल्यामुळे तिने पैशासाठी आरोपीकडे तगादा लावला आरोपीने पैशे देण्यास नकार देताच. तिने वाळूज औद्योगिक पोलिसांकडे तक्रार दिली.या प्रकरणी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत गंभीरराव अधिक तपास करीत आहेत