AurangabadCrimeUpdate : दीड लाखांच्यामंगळसूत्रासहित चोरटा पकडला, आणखी तीन गुन्हे उघडकीस

औरंगाबाद – कुख्यात मंगळसूत्र चोराला रांजणगाव परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने सिडकोत काही दिवसांपूर्वी हिसकावलेले ३तोळ्याचे दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र पोलिसांच्या हवाली केले.तसेच सिडको पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली.व सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात दाखल असलेली मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.
वैभव गजानन इंगोले (२३) रा. कमळापूर रांजणगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. शहर परिसरातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सिडको पोलिसांनी व्यक्त केली आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके आणि पथकाने पार पाडली