AccidentNewsUpdate : औरंगाबाद -नगर रस्त्यावर झालेल्या कार अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : पुणे येथे आपल्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात सोडून घरी परतत असताना सुपा अहमदनगर दरम्यान कारला झालेल्या भीषण अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा पासून दहा किलोमीटर पुढे नगर ला जाताना. MH- 20 DJ9695 या गाडीला हा गंभीर अपघात झाला. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
या अपघातातातील मयत संजय लेंडाळ हे लाडसावंगी केंद्रात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी निता कर्डीले या सुद्धा शिक्षिका आहेत. तर दुसरे मयत
चंद्रशेखर ठाकूर हे सुद्धा शिक्षक असून हे दोघेही चांगले मित्र होते. उत्कृष्ट गायक म्हणून ठाकूर सर्वांना परिचित होते . त्यांच्या पत्नी वंदना ठाकूर यासुद्धा शिक्षिका आहेत. प्रविण गायकवाड सर यांचे ते मेहुणे होते. संजय लेंडाळ यांचा अंत्यविधी त्यांच्या गावी मौजे.सोनेरी बोधेगावजवळ ता.शेवगाव जि.अ.नगर येथे 1.00वाजता होणार आहे.