Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : जाणून घ्या कोरोनाची देशाची स्थिती काय आहे ?

Spread the love

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 44,111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 738 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 57,477 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील आजची कोरोना स्थिती

एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 5 लाख 2 हजार 362
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 96 लाख 5 हजार 779
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 95 हजार 533
एकूण मृत्यू : 4 लाख 1 हजार 50

देशात सलग 51व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 2 जुलैपर्यंत देशभरात 34 कोटी 50 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 50 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41.64 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल्स तपासण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

दरम्यान राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल  8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 16 हजारांच्या जवळ आल्या आहेत. विशेष म्हणजे काल मालेगाव आणि नंदुरबारमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर आज राज्यातील 34 शहरे  आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!