Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : बारावी परीक्षेच्या निकालाचा गुंता सुटला

Spread the love

मुंबई : राज्यात कोरोनाने हाहाकार केला त्यामुळे राज्यातील दहावीची आणि बारावीची परिक्षा रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्र सरकारला याबाबत विचारणा केली होती. दरम्यान, निकालाच्या मूल्यमापनाबाबत शासनाने निर्णय जाहीर केला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ट महाविद्यालय अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे, असे शासनाने जाहीर केले आहे.

असे होईल मूल्यमापन

बारावीच्या निकालाचे मुल्यमापन (२०२१) करतांना शासन निर्णय २०१९ मधील विषयनिहाय लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिकाचे अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारीत केलेले गुण कायम ठेवण्यात येतील, असे शासनाने म्हटले आहे. शासनाने यासाठी ३०:३०:४० असा फॉर्म्युला ठरवला आहे. शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेतील गुण, अकरावीच्या अंतीम परीक्षेतील गुण तसेच बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील गुण यानुसार भारांश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे मुल्यामापन करण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी निर्धारीत एकूण गुणांपैकी ३० टक्के गुण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील, ३० टक्के गुण अकरावीच्या परिक्षेतील तसेच ४० टक्के गुण बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापनातील गुण यानुसार भारांश विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे मुल्यांकन केले जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!