AurangabadNewsUpdate : ह्रदयद्रावक : कौटुंबिक कलहातून विवाहितेची मुलांसह आत्महत्या

औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून विवाहितेने दोन मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृद्यद्रावक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गेवराई तांडायेथील वैशाली रविंद्र थोरात (२७) यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास कौटुंबिक कलहातून निर्लेप कंपनीच्या पाठीमागे असलेल्या बेथरडा यांच्या शेतातील विहीरीत मुलगी आरोही (६) आणि मुलगा पियूष (३) यांच्यासह उडी घेऊन आत्महत्या केली.
उपअधीक्षक विशाल नेहूल, चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक अश्विनी कुंभार, सहायक फौजदार काशीनाथ लुटे, जमादार संपत राठोड, पोलीस नाईक सुरासे यांनी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह विहीरीबाहेर काढले. त्यानंतर तिघांच्या मृतदेहाची घाटीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उद्या शवविच्छेदन झाल्यानंतर तसेच मृतदेहांवर अंत्यसस्कार झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती एपीआय विश्र्वास पाटील यांनी दिली.