IndiaNewsUpdate : कोण म्हणतो कोरोना काळात धंदा नाही , जीएसटीचे हे कलेक्शन पहा….

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊच्या काळात अर्थव्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र असतानाही कोरोनाच्या प्रकोपानंतर सलग सहाव्यांदा जीएसटी 1 लाख कोटीच्या पार मिळाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे मार्च महिन्यातील जीएसटी कलेक्शनने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे. याबाबत देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी मिळाला असल्याचे ट्वीट अर्थमंत्रालयाने केले आहे.
✅GST Revenue collection for March’ 21 sets new record
✅The gross GST revenue collected in the month of March 2021 is at a record of ₹ 1,23,902 crore
(1/3)
Read more➡️ https://t.co/QXBBbOAxvv pic.twitter.com/P6DIxtwjpk— Ministry of Finance (@FinMinIndia) April 1, 2021
अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या एकूण जीएसटीत केंद्रीचा जीएसटी 22,973 कोटी, राज्याचा जीएसटी 29,329 कोटी आणि एकीकृत जीएसटी 62,842 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर उपकर 8 हजार 757 कोटी इतका आहे. यात 935 कोटी रुपये वस्तु आयातीवर मिळालेल्या कराचे आहेत.
कोरोना प्रकोपानंतर गेल्या 6 महिन्यांचे जीएसटी कलेक्शन
मार्च 2021 1,23,902
फेब्रुवारी 2021 1,13,143
जानेवारी 2021 1,19,847
डिसेंबर 2020 1,15,174
नोव्हेंबर 2020 1,04,963
ऑक्टोबर 2020 1,05,155