National Film Awards 2021 : GoodNews : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात “यांनी” लावला मराठीचा झेंडा !!
आनंदी गोपाळ
नवी दिल्ली : नुकत्याच जाहीर झालेल्या 2019 च्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी पाऊल पुन्हा एकदा पुढे पडले आहे. पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या मालिकेत यावर्षी बार्डो, आनंदी गोपाळ, त्रिज्या, पिकासो, खिसा यांच्यासह याशिवाय, विवेक वाघ यांच्या ‘जक्कल’ या चित्रकृतीलाही गोरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर हे चित्रपट प्रदान केले जातात . यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे हे 67 वे वर्ष आहे.
बार्डो
मागील वर्षी मे महिन्यामध्येच हा पुरस्कार सोहळा पार पडणे अपेक्षित होते. देशावर आलेल्या कोरोना व्हायरच्या संकटामुळे यंदाच्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा उशिरा करण्यात आली. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येते. पण, 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्यांना उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते पुस्कार प्रदान करण्यात आला होता. ज्यानंतर राष्ट्रपतींकडून विजेत्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. विशेष म्हणजे यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्षपद एन. चंद्रा या दिग्दर्शकाकडे सोपवण्यात आले होते.
या वर्षी बहुचर्चित कंगना रणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तर मनोज वाजपेयी आणि धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे . तर सुशांतसिंग राजपूतचा ‘छिछोरे’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला असून मराठमोळ्या पल्लवी जोशीलाही सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट चित्रपट : मर्कर लॉयन ऑफ द अरेबियन सी (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग : जर्से (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट गायिका : सावनी रविंद्र : बार्डो
सर्वोत्कृष्ट गायक : बी प्राक : (तेरी मिट्टी- केसरी)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी ( द ताश्कंद फाईल्स )
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता : विजय सेतुपथी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना रणौत (मनिकर्णिका, पंगा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले)
धनुष (तमीळ) : सर्वोत्कृष्ट स्पेशल मेन्शन
बिरयानी (मल्याळम) : जौनकी पोरा (आसामी)
लता भगवान करे (मराठी) : पिकासू (मराठी)
सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म : बार्डो
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : छिछोरे
सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : आनंदी गोपाळ
राष्ट्रीय इंटर्गेशनवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : ताजमहाल
Non-feature विभागातील विजेते
ऑडियोग्राफी : राधा
ऑन लोकेशन साऊंड रेकॉर्डीस्ट : रहस
सर्वोत्कृष्ट छायांकन : सविसा सिंह (सोनसी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : नॉक नॉक नॉक
सर्वोत्कृष्ट कौटुंबीक मुल्य असणारा चित्रपट : ओरु पाथिरा
सर्वोत्कृष्ट लघू काल्पनिकपट : कस्टडी
सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार : स्मॉल स्केल वॅल्यू
बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह : जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट : होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट : द स्टॉर्क सेवियर्स
सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य : सिक्कीम
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- महर्षी
नर्गिस दत्त बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार : TAJMAHAL
सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट : कस्तूरी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : BAHATTAR HOORAIN (हिंदी)
सर्वोत्कृष्ट छायांकन : जल्लीकट्टू (मल्याळम)
बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह : जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट : होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट : द स्टॉर्क सेवियर्स
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) : सोहिनी चट्टोपाध्याय
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ : कोकणी चित्रपट काजरो