#MaharashtraCoronaUpdate : राज्यात चार महिन्यांतले 24 तासांत सर्वाधिक कोरोना रुग्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रात आज दिवसभरात 15 हजार 817 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 11 हजार 344 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच, मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 1 हजार 646 रुग्ण आढळले आहेत.

Advertisements

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 वर पोहोचली आहे. तर सध्या 1 लाख 10 हजार 485 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 21 लाख 17 हजार 744 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. रुग्ण बरं होण्याचा दर 92.79 टक्के आहे. राज्यातील मृतांचा आकडा 52 हजार 723 वर पोहोचला आहे. मृत्यूदर 2.31 टक्के आहे. सध्या 5 लाख 42 हजार 693 जण होम क्वॉरन्टीन असून 4 हजार 884 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीन आहेत. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या 1 कोटी 73 लाख 10 हजार 586 पैकी 22 लाख 82 हजार 191 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत.

Advertisements
Advertisements

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!