Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 48 तासांनंतर घरी परतल्या

Spread the love

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना एसएसकेएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीएम ममता पुढील दोन-तीन दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असणार आहेत. ममता बॅनर्जी यांना 48 तासांच्या वैद्यकीय निरीक्षणामध्ये ठेवण्यास एसएसकेएम हॉस्पिटलने सांगितले होते. मात्र, त्या वारंवार डिस्चार्जसाठी आग्रह करत होत्या. त्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत, त्या आता थोडीशी हालचाल करू शकतात. मात्र, त्यांना व्हील चेअर वापरावी लागणार आहे.

बुधवारी संध्याकाळी नंदीग्राममध्ये जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना तातडीने कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी रुग्णालयाच्या बेडवरुन प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, काही दिवसांत त्या प्रचारासाठी परत येतील आणि गरज पडल्यास व्हील चेअरचा वापर करतील. दरम्यान, त्यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले होते.

ममता बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान चार-पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ढकलले तसेच कारच्या दरवाजाला दणका दिला ज्यामुळे त्या जखमी झाल्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या डाव्या पायाला, कमरेला, खांद्याला आणि मानेला दुखापत झाल्या आहेत. ममता बॅनर्जी 13 मार्च रोजी पुरुलिया येथे जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. पुरुलियामधील बलरामपूर आणि बाघमुंडी येथे त्यांचे कार्यक्रम आहेत. 14 मार्चला बांकुरा आणि 15 मार्चला झारग्रामला भेट देतील. यानंतर, 17 मार्च रोजी पूर्व मिदनापूरच्या आग्रा, पाटपूर आणि तनलुक येथे जाहीर सभांना संबोधित करण्याची शक्यता आहे. नंदीग्राम देखील पूर्व मिदनापूरमध्येच आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!