मुंबईच्या गोल्डमॅनला दारुच्या नशेत लुबाडले, दोघांना अटक

औरंगाबाद – शहरात घाटकोपर मुंबईहून नातेवाईकाच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाला ज्याच्या दोन्ही हातात सोन्याच्या अंगठ्या ब्रेसलेट गळ्यात चैन घालून मुकुंदवाडीत दारु पिऊन फेरफटका मारत असतांना रेकाॅर्डवरील एका चोरट्याने साथीदाराच्या मदतीने गळ्यातील चैन हिसकावली या प्रकरणी गुन्हा दाखल होताच एका तासात चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.व हिसकावलेली चैन जप्त केली.
संतोष आनंद जाधव (३०) धंदा चालक रा.घाटकोपर (प)मुंबई. असे फिर्यादीचे नाव आहे. तर दिपक रमेश साबळे (२७) रा.ब्रीजवाडी व उमेश गौतम गवळे (३०) रा.गुलमोहरकाॅलनी अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील पैकी दिपक साबळे हा रेकाॅर्डवरचा आरोपी आहे.आज संध्याकाळी साडेपाच वा. फिर्यादी जाधव दारुच्या नशेत तर्रर्र होऊन मुकुंदवाडी भाजी मंडईत फेरफटका मारत होते. हा प्रकार दिपक साबळे ने पहाताच त्याने साथीदार गवळे ला इशारा केला. दोघांनी मिळून संतोष जाधव ला मारहाण करत त्याच्या गळ्यातील चैन हिसकावली. पण जाधव यांनी प्रसंगावधान दाखवत चेन घट्ट पकडली. तरीही आर्धी चैन साबळे च्या हातात गेली. दरम्यान नागरिकांमधून मुकुंदवाडी पोलिसांना वरील घटना कळली होती. तसैच संतोष जाधव फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते जाधव यांनी तक्रार देताच वरील आरोपींना पोलिसांनी पकडून आणले. जाधव यांनी आरोपींना ओळखले. तसेच आरोपींनीही गुन्ह्याची कबुली देत आर्धी तुटलेली ३०हजार रु.ची चैन पोलिसांकडे सूपूर्द केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करत आहेत.