मुंबई व औरंगाबाद वकील संघटनेच्या महिनाभरात निवडणूका घेण्याचे आदेश

औरंगाबाद – मुंबई आणि गोवा बार कौन्सिल ने मुंबई व औरंगाबाद वकील संघटनेच्या अध्यक्षांना येत्या महिनाभरात निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती बार कौन्सिल चे प्रमुख अनिल गोवरदिपे यांनी दिली.
वकील संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा महाजन यांना बार कौन्सिल ने गेल्या २४ डिसेंबर २० रोजी पत्रपाठवून जानेवारी २१ मध्ये वकील संघटनेच्या निवडणूका घेण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.पण त्या पत्राला अॅ. महाजन यांनी उत्तर दिले नसल्यामुळे बार कौन्सिलने एक महिन्यात नव्या निवडणूका घेऊन कार्यकारणी जाहिर करण्याचे आदेश दिले आहेत.