Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव

Spread the love

अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे.

दरम्यान, याप्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबले असे म्हणणे चुकीचे आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहात देखील सुंगीतला. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना देखील न्यायालयाचा अवमान करणारे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून ते त्यांनी जाणूनबुजून केले आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अन्वय नाईक यांच्याबद्दल केलेले विधान अनिल देशमुख यांनी एकदा केले नसून त्यांची पुनरावृत्ती केली. सदर वक्तव्य करून त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा भंग त्यांनी केला आहे. हे प्रकरण विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!