Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SadNews : नायर रुग्णालयातील औरंगाबादच्या डॉक्टरची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई । औरंगाबाद येथील  एका तरुण डॉक्टरने मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अवघ्या 26 व्या वर्षी या डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या खोलीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता असून अद्याप आत्महत्येचे  कारण मात्र अस्पष्ट आहे. काल मध्यरात्री त्याने स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला असून, विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नायर रुग्णालयात यापूर्वी २०१९ मध्ये डॉ. पायल तडवी हिनेही आत्महत्या केली होती.

Advertisements

रुग्णालयाच्या आग्रीपाडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे (28) रा.ठी. 9 माळा, रूम नं. 930, नायर हॉस्पिटल, आग्रीपाडा, मुंबई असून ते 3 दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये जाऊन आले होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते औरंगाबादेत गेले होते. परवा ते औरंगाबाद इथून परतले, सोमवारी त्यांनी दिवसभर काम केले. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांनी आत्महत्याकेली. काल मध्यरात्री खोलीत त्यांचा  मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे अॅनेस्थेशिया विभागात एमडीचे शिक्षण घेत होते. अद्याप डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे यांनी का आत्महत्या केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अग्निपाडा पोलीस ठाण्यात याप्रकणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!