जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत मारहाण

औरंंगाबाद : रस्त्यात अडवून दुचाकीवर जबरदस्तीने बसून गेल्यानंतर कामगाराला मारहाण करत त्याची दुचाकी लांबवली. ही घटना १ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास समर्थनगरात घडली.
कचरू मुकुंद नागरे (वय ३५, रा. वसडी, ता. कन्नड, ह.मू. आनंद पार्क, सिल्लोड) हे १ पेâब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीने (एमएच-२०-डीवाय-०८८०) समर्थनगर भागातून जात होते. वामन हरी पेठे ज्वेलर्स दुकानासमोर त्यांना दलासिंग सलामपुरे (रा. बेगमपुरा) याने अडविले. जबरदस्तीने कचरू यांच्या दुचाकीवर बसून त्यांना सिल्लेखाना भागातील शासकीय वाचनालयाजवळ नेले. तिथे त्यांना सलामपुरे याने मारहाण करून त्यांची दुचाकी लांबवली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.
क्षुल्लक कारणावरून मारहाण
औरंगाबाद : निकम्मा म्हटल्याचा जाब विचारताच मित्रांनी एकाला डोळ्याखाली लोखंडी वस्तूने मारून जखमी केले. ही घटना १ पेâब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अयोध्या नगरी मंदिराजवळ घडली. संजय अभिमन्यू वाहूळे (वय ३४, रा. राहुल नगर, रेल्वेस्टेशन) यांना त्यांचा मित्र जावेद बेग बाबा बेग व त्याचा साथीदाराने निकम्मा म्हटले. त्याचा वाहूळे यांनी जाब विचारताच दोघांनी त्यांच्या डोळ्याखाली लोखंडी वस्तूने मारून जखमी करून पसार झाले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक वायाळ करत आहेत.
मजुराला रॉडने मारहाण
औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून मजुराला तिघांनी दांड्याने व रॉडने मारहाण केली. ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ घडली. भारत उर्फ जॉन शंकर तीर्थे (वय २८, रा. गल्ली क्र. १५, जयभवानी नगर, मुकुंदवाडी) हे रात्री अकराच्या सुमारास घरात बसलेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या शुभम भिकुलाल जाट व त्याच्या दोन साथीदारांनी भारत याला घराबाहेर बोलावले. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात दांड्याने व दोन्ही पायांवर लोखंडी रॉडने मारून जखमी केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक घायाळ करत आहेत.