शहर वाहतूक शाखेची सर्तकता, चोरीची मोटरसायकल शोधली

औरंगाबाद – संशयास्पद अवस्थेत असलेली मोटरसायकलचे डिटेल्स तपासले असता ती चोरी झाल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले.पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी मोटरसायकल संबंधित पोलिस ठाण्याकडे सूपूर्द केली.
अमरप्रित सिग्नलवर संशयास्पद अवस्थेत असलेली मोटरसायकल कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी कैलास जाधव आणि भगवान जगताप, कैलास गायकवाड, अंकुश टेकाळे यांना आढळून आली. त्यांनी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना या बाबत माहिती देऊन इ चलान मशीन मधून मोटरसायकल चे तपशील मिळवले.तेंव्हा ही मोटरसायकल हर्सूल मधील शेख मुन्ना यांची असल्याचे कळले. तसेच या मोटरसायकलबाबत चिकलठाणा पोलिस ठाण्यात ९जानेवारी २१रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक देशमुख यांनी मोटरसायकल मालक आणि चिकलठाणा पोलिसांना बोलावून मोटरसायकल पोलिसांकडे सूपूर्द केली.