अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे ? सावधान !

अमित पुजारी । महानायक वृत्त सेवा । औरंगाबाद
आज काल सामाजिक माध्यमांवर अनेक जन दिवसेन दिवस घालवतात त्यात काही माध्यमांद्वारे जुने तसेच नवनवीन मित्र देखील मिळतात. परंतु काहिंनी याचा दुरुपयोग तसेच याच माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा प्रकार सुरु केल्याचे समोर येत आहे. त्यात ते समाज माध्यमांवर मुलींच्या नावाचे खाते तयार करत असून त्यातून लोकांना अश्लील्तेत नेत असून त्यांचे व्हिडीओ तयार करून त्यांना सुरुवातीला दाखवून समाजात तसेच सामाज माध्यमांवर असलेल्या मित्रांना शेअर करण्याची धमकी देत पैसा किंवा दुरुपयोग करण्याची धमकी देण्याचे प्रकार समोर येत आहे.
समाज माध्यम हि काळाची गरज बनत चालली आहे. आज काल अबाल वृद्ध याचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. कोणी या वरून वर्षानवर्षे न भेटलेल्या मित्रांना यावर भेटत असतात तर अनेक जन नवनवीन मित्र समाज माध्यमांवर मिळतील म्हणून शोधात असतात. त्यामुळे या माध्यमांचा उपयोग कोणी चांगल्या कामासाठी करत असतात. तर कोणी लबाडी साठी करत असल्याचे समोर आले आहे. यात सुरुवातीला लबाडी करणारे मुलींच्या नावाने खोटे खाते तयार करत असतात. खात्यावर मनमोहक असे मुलीचे छायाचित्र जोडतात, आणि मग त्या खात्याद्वारे समाज माध्यमांवर सतत वापर करणाऱ्या पुरुषांना ते मैत्रीसाठी पुढाकार घेतात, काही जन कोणताहि विचार न करता त्या मैत्रीची पुष्टी करतात. सुरुवातीला सर्व साधारण नवीन मित्रा प्रमाणे खोटे खाते तयार करणारे बोलायला सुरुवात करतात. त्यात आपण काय करतात, कुठून आहात, घरी कोण कोण असत, घराची आणि तसेच पैश्याने परिस्थिती काय याचा अंदाज ते घेतात नंतर, ते मोबईल क्रमांकाची मागणी करतात. मोबाईल क्रमांकाद्वारे लगेचच दुसऱ्या समाज माध्यमांचा उपयोग करून व्हिडिओ कॉल लावण्या संबंधी विचारणा करतात, त्यात आपल्या आस पास कोण कोण आहे याची विचारणा आवर्जून करतात. आपण एकटे असल्याचे पुष्टी झाल्यावर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करत व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतात. नंतर तोच व्हिडिओ कॉल आपल्या पाठवतात. सोबत आपल्या समाज माध्यमांवर असलेल्या मित्रांचे फोटो पाठवत तुमच्या सोबत केलेल्या अश्लील व्हिडिओ कॉल समाज माध्यमांवर पसरवण्याच्या धमक्या देत गरजेनुसार मागणी करत असल्याचे स्टिंग ऑपरेशन द्वारे समोर आले आहे. यात भीती पोटी अनेक जन पोलिसांकडे जाणे टाळत आहे, तर काही जन आपली समाजात बदनामी होऊ नये म्हणून अश्या खोट्या खात्यातून लोकांना लुबाडणाऱ्या लबाडांना पैसा तसेच त्यांची मागणी पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करून लोकांची बदनामी करण्याची धमकी देत पैसे कमावण्याचे उद्योग समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. पोलीस यंत्रणा देखील अश्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहे. परंतु बदनामी पोटी अनेक जन तक्रार करण्यासाठी समोर जात नाही आहे. त्यामुळे अश्या खोट्या खात्याना खत पाणी मिळत आहे.
अश्या वेळी काय करावे
सुरुवातीला आपल्याला अनोळखी मुलींची मैत्रीसाठी मागणी आली असेल तर आपण पुष्टी न करता त्या मुलीच्या खात्या संबंधी संपूर्ण माहिती तपासून घ्यावी, अनेक खोटे खाते तयार करणारे सुरुवातीला आपल्या अप्तेष्ठाना देखील मैत्रीची मागणी करतात. आपल्या अप्तेष्ठांपैकी कोणी जर अश्या खोट्या खात्याशी जुळवणी केली असेल तर खोट्या मुलींच्या नावाने तयार करण्यात आलेल्या खात्य संबंधी माहिती त्या मित्रांना विचार जर यातून देखील अनोळखी पण वाटत असेल तर त्या खात्यावरून आलेल्या संदेशांना कोणतेही प्रतिउत्तर देऊ नका. जरी आपण प्रतिउत्तर देऊन संभाषण सुरु केले असेल तर आपली वयक्तिक कोणतीही माहिती अश्या खोट्या खात्याना देऊ नका. ते तुम्हाला वारंवार तुमच्या मोबाईल क्रमांक मागण्याचा प्रयत्न करतील त्याना तुमचा मोबाईल क्रमांक देऊ नका. तुम्ही जर अश्या काही खोट्या खात्यावर अडकला असाल तर निसंकोच पणे पोलिसात तक्रार करा. ज्या मुळे अश्या समाज विघातक कृतींना आळा घाल्यासाठी पोलिसांना आपली मदत होईल.