MaharashtraNewsUpdate : सुशांत सिंहच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीवर बोलले गृहमंत्री अनिल देशमुख

देशभर गाजलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या मुद्यावरून राज्यात मोठा वाद झाला होता. त्याचबरोबर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही करण्यात आला. नंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यावरून गृहमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
सुशांतसिंग प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवून जवळपास ४ महिने झाले. मात्र CBI ने अजूनही सुशांतसिंगची आत्महत्या होती की हत्या याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. नागरिकांना या प्रकरणाबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे CBI ने या तपासाबाबत लवकरात लवकर खुलासा करावा,अशी मी विनंती करतो. pic.twitter.com/KvWmVprJfM
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) December 27, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचंही म्हटलं होतं. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं गुढ उलगडलेलं नाही.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना सीबीआयच्या तपासाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. “सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.