aharashtraNewsUpdate : भीमा कोरेगाव आणि परिसरातील ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत प्रवेश बंदी

भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. पण यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगाव सह अकरा गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज काढले आहे. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
Maharashtra: Pune district administration imposes restrictions as per Section 144 between 30th Dec to 2nd Jan 2021 (6 am) in 17 villages, including Perne Phata & Koregaon Bhima area, ahead of Bhima Koregaon anniversary event scheduled on 1st January 2021
— ANI (@ANI) December 24, 2020
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.