IndiaNewsUpdate : पंतप्रधान म्हणाले ” नमस्कार !! ” लातूरचे गणेश भोसले म्हणाले , ” राम, राम पंतप्रधान साहेब…!!”

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी वाटप करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका विशेष बटणच्या मदतीने शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा केले. यातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर २ हज रुपये जमा करण्यात आले. दरम्यान केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. देशातल्या वेगवेगळया भागातील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेताना, मोदींनी महाराष्ट्रातील बीड , लातूरमधील शेतकऱ्याशी संवाद साधला.
PM Narendra Modi releases Rs 18,000 crore as the next instalment under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme to over 9 crore farmers pic.twitter.com/3vxIAvgwF3
— ANI (@ANI) December 25, 2020
यावेळी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकरी गणेश राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी नमस्ते म्हणत गणेश भोसले यांना साद घातली, त्यावर गणेश भोसले यांनी “रामराम पंतप्रधान साहेब…!! ” म्हणत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोदींनीही रामराम म्हणत बोलण्यास सुरुवात केली. यावेळी, ‘शेतीमध्ये जास्त पैसा येतो की पशुपालनमधून येतो? असा सवाल मोदींनी विचारला. त्यावर भोसले यांनी उत्तर देताना म्हटले कि , ‘शेतीमध्येही पैसा येतो. पण गायी आणि म्हशीचे दूध विक्री करूनही जास्त पैसा मिळतो. मागील वर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. पंतप्रधान किसान पिक योजनेचा मी फायदा घेतला होता. मी अडीच हजार रुपये भरले होते. मला ५४ हजारांचा परतावा मिळाला होता . माझाकडे ९ गायी आणि म्हशी आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, अशी व्यथा भोसले यांनी मांडली.
खा. प्रीतम मुंडे यांच्यासह बीडचे शेतकरीही सहभागी
या संवाद कार्यक्रमात बीडचे शेतकरीही सहभागी झाले होते. बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या वितरण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीडच्या शेतकऱ्यांसोबतही संवाद साधला. या कार्यक्रमात भाजप खासदार डॉ प्रीतम मुंडे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बीडमधील अनेक लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील शेतकरी देखील सहभागी झाले होते. यावेळी मोदी यांनी नव्या शेतकरी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी शंकाचे निरसन केले. आणि आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान कृषी विमा योजनेचे महत्त्व पटवून देताना महाराष्ट्रातील गणेश भोसले या लातूरच्या या शेतकऱ्याचे उदहारण दिले.