Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपवासी चिरंजीव सुजयच्या “प्रतापा”ने काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे आणि प्रदेशाध्यक्षांची गोची …

Spread the love

चिरंजीव सुजयच्या प्रतापाने काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील  असून त्यांना काँग्रेसकडून प्रचार करायला तोंड तर राहिलेच नाही पण प्रदेशाध्यक्षांनाही या प्रकरणी उत्तरे देणे कठीण झाले आहे . राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचा छुपा प्रचार करत आहेत, मग तुमचे कार्यकर्ते  काँग्रेसचा कसा प्रचार करतील,  या प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  म्हणाले की, तसे काहीही नाही. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचाच प्रचार करतात. मात्र, तशी तक्रार असल्यास आम्ही पक्षाच्यावतीने त्यांना समज देऊ. तुमचे विरोधी पक्षनेते भाजपा उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे फोटो फिरताहेत. तर तुम्ही लोकांकडे कशी मतं मागणार? असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला होता. तर, मुलाच्या भाजपा प्रवेशानंतर, निवडणूक प्रचारात विरोधी पक्ष नेतेच जर त्यांच्या जिल्ह्यात पक्षाचे काम करणार नसतील तर पक्षासाठी काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्या तोंडाने जाब विचारायचा, असा प्रश्न काँग्रेसमधील काही नेत्यांना पडला आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढत असल्याचेही बोलले जाते.

राहुल गांधींना सुजयने केले “इग्नोर” तर शरद पवारांना दुरुत्तर…

दरम्यान, डॉ. सुजय विखे यांच्याबाबत अशीही माहिती मिळत आहे कि , सुजय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही भेटायला गेले होते. त्यांच्याशी बोलून निघताना ‘तुम्ही काहीही निर्णय घ्या, पण मी उभे राहणारच आहे’ असे त्यांनाही ऐकवले होते. त्यामुळे पवारांचीही नाराजी त्यांनी ओढावून घेतली. विखे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन सुजय माझे ऐकत नाही, असे गाऱ्हाणे घातले होते. त्यावर राहुल गांधी यांनी सुजयशी फोनवर बोलणे केले होते. तुम्हाला नंतर योग्य संधी देऊ, आता तुम्ही पक्ष सोडू नका, असेही सांगितले होते. तरीही सुजय यांनी भाजपात प्रवेश केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!