AurangabadCrimeUpdate : सिटी स्कॅन रिपोर्ट बघून येणे पडले महागात, बंद हाथकडीसह कैदी फरार

औरंगाबाद – उपचार सुरु असलेल्या कैद्याचा सि.टी. स्कॅन रिपोर्ट बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्याला आणण्यास पाठवले असता बंद हाथकडीतील कैदी हातात पाण्याची बाटली घेऊन पसार झाला. या हलगर्जीपणा बद्दल कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचार्याची, तिथल्या डाॅक्टरांची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्टी करण हर्सूल मध्यवर्ती कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले.
दरम्यान तुरुंग अधिक्षक जयंत नाईक यांनी आपण पोलिसउपमहानिरीक्षकांकडे कारागृह कर्मचार्याच्या ताब्यातून कैदी पळाल्याचा अहवाल पाठवत असल्याची माहिती दिली. किशोर विलास आव्हाड (२४) रा.राजनगर मुकुंदवाडी असे पळून कैद्याचे नाव आहे.तर भरत तुकाराम रामगुडे (३८) असे हलगर्जी पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.
जवाहरनगर आणि छावणी पोलिस ठाण्यांमधील पोक्सोच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून आव्हाड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भौगत होता. २डिसेंबर रोजी आरोपी आव्हाड याची प्रकृती खराब झाल्यामुळे काराग हातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.जहागिरदार यांनी आरोपी आव्हाड यास घाटीत उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले.त्यानुसार वाॅर्ड क्र.ं १८ मधे दाखल केले असता. पोलिस कर्मचारी भरत रामगुडे हे आज (५डिसें) सकाळी ६ वाजेपासून आरोपीच्या बंदोबस्तात हजर होते. सकाळी साडे आठ वा.डाॅक्टर राऊंड घेण्यास आले. त्यांनी पोलिस कर्मचारी रामगुडे यांना आरोपी आव्हाड चा सिटी स्कॅन रिपोर्ट घेऊन येण्यास सांगितले. म्हणून रामगुडे यांनी आव्हाड ची हाथकडी आणि दोरखंड योग्य रितीने बांधलेला असल्याची खात्री करुन सिटी स्कॅन रिपोर्ट आणण्याकरता रवाना झाले. पण जात असतांना रामगुडे यांना संशय आला की, आरोपीची हाथकडी व दोरखंड व्यवस्थित आहेत का ? म्हणून अर्ध्या रस्त्यातून परंत फिरुन वाॅर्ड क्र १८मधे येताच किशोर आव्हाड बंद हाथकडी व दोरखंड तसाच ठेवून पसार झाल्याचे आढळले. हा घटनाक्रम गुन्हेशाखेला कृल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.
घाटी रुग्णालयाचे सी.सी. टिव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी आरोपी आव्हाड हा हातात पाण्याची बाटली घेऊन ओपीडी मधून वेगाने चालत बाहेर पडतांना दिसला.दरम्यान भरत रामगुडे यांनी कैदी त्यांच्या हातातून निसटल्याची फिर्याद बेगमपुरा पोलिसांना दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी आरोपी आव्हाड चा शोध घेण्यासाठी पथक पाठवले आहे.