AnvayNaikSuicideCase : राज्यपालांच्या फोनवर गृहमंत्र्यांचे जाहीर उत्तर , अर्णबच्या कुटुंबियांच्या भेटीबद्दल केला हा खुलासा

अन्वय नाईकच्या आत्महत्येच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतः राज्याच्या गृमंत्र्यांना फोन करून त्याला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही राज्यपालांना अशी भेट देता येणार नाही आणि का देता येणार नाही याचे उत्तर पत्रकार परिषदेत दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून सर्व जेलमध्ये कैद्याच्या नातेवाईकांनी भेटण्यास मनाई आहे. संसर्गाचा धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच अर्णबच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर त्यांच्याशी बोलू शकतात,’ असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं आहे. त्याचबरोबर ‘तुरुंगात फोन वापरण्याची परवानगी नाही पण जेल प्रशासनाला तशी परवानगी देण्याचे अधिकार आहेत. अशी परवानगी घेतल्यानंतर अर्णब यांचे नातेवाईक किंवा वकिल प्रत्यक्ष भेटू शकणार नसले तरी त्यांना फोनवर अर्णब यांच्याशी चर्चा करू शकतात.
गृहमंत्री म्हणाले कि , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब यांच्या कुटुंबीयांनी जेलमध्ये जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी फोन केला होता.अर्णब गोस्वामीच्या आरोग्याबाबत राज्यपालांनी व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल ते म्हणाले त्यांची योग्य काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्या तब्यतीची चिंता करू नये . शिवाय याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारणही चांगलेच रंगले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अर्णब यांची अटक ही कायद्याला धरुन असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येतं आहे तर, भाजपनं मात्र ही अटक सुडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. देवेन्द्र फडणवीस यांनी तर या प्रकरणात स्वतः उच्च न्यायालयाने सु -मोटो याचिका दाखल करून अर्णबला न्याय द्यावा असे म्हटले आहे . जेंव्हा कि , उच्च न्यायालयाने स्वतःच या प्रकरणाला विशेष बाब मानण्यास नकार देऊन अंतरिम दिलासा देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.