AurangabadCrimeUpdate : नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून लाटलेले ८ लाख मिळाले परत

औरंगाबाद – सप्टेंबर २०२० मधे सिडको पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यातील ८ लाख रु. परंत मिळाल्याचे श्रेय सिडको पोलिसांना देत फिर्यादीने त्यांचा सत्कार केला. सप्टेंबर २०मधे सहाय्यक प्राध्यापकाची नौकरी लावून देण्याचे शहरातील डाॅ.अस्मिता शरद साळवे यांना ओळखीतील भामट्यांनी दाखवले होते .
या प्रकरणी नाशिकच्या भामट्यांनी डाॅ.साळवे यांचे ८ लाख रु.हडपले होते. या प्रकरणी चार आरोपींवर सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करत नाशिकमधून प्रमुख आरोपीला अटक केली. या प्रकरणात मनिष माटे रा. औरंगाबाद, नितीन चंद्रशेखर देशमुख नाशिक, परेश चंद्रशेखर देशमुख आणि शकुंतला चंद्रशेखर देशमुख असे चार आरोपी आहेत. या पैकी परेश चंद्रशेखर देशमुखला सिडको पोलिसांनी नाशिकहून अटक करुन आणले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.तसेच परेशची आई शकुंतला हिला कोर्टाने ताबडतोब ८लाख रु.जमा करण्याचे आदेश दिले होते.
आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अटक करण्याचे आदेश सिडको पोलिसांना दिले होते. दरम्यान आरोपी शकुंतला देशमुख ने ८लाख रु. कोर्टात भरताच न्यायालयाने डाॅ.साळवे यांना८लाखांचा डिमांड ड्राफ्ट सूपूर्द केला. या प्रकरणात पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रविण पाटील यांनी उत्तम कामगिरी बजावली हौती. म्हणून पोलिसांचे आभार मानण्याकरता डाॅ.साळवे यांनी सिडको पोलिस निरीक्षक अशोक गिरी आणि पीएसआय पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.