Anvay Naik Suicide Case : अर्णब गोस्वामीचा तुरुंगातील मुक्काम वाढला , उद्या पुन्हा सुनावणी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामीला आजही मुंबई हाटकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही त्यामुळे अर्णबचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे . गोस्वामी याच्या जामीन अर्जावर आता उद्या दुपारी १२ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान उद्या केवळ अंतरिम दिलासाविषयी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिले आहेत
रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामी याला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली आहे. गोस्वामीला अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा तसेच तत्काळ आपल्याला जामीन मिळावा, यासाठी अर्णबच्यावतीने हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे.
दरम्यान अर्णबच्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी वेळी तक्रारदार आज्ञा नाईक, सरकारी पक्ष आणि पोलिसांची बाजू ऐकूनच निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने नमूद केले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. आज दुपारी ३ वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अर्णब गोस्वामीच्यावतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुनावणी चालली. त्यानंतर ‘आज सुनावणी पूर्ण करणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे उद्या दुपारी ११ वाजता आम्ही पुन्हा सुनावणी ठेवू, असे नमूद करत कोर्टाने अर्णबला आज कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही.
या प्राणात अर्णबच्या बाजूने युक्तिवाद करताना हरीश साळवे म्हणाले कि , अशाप्रकारच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाला अनुच्छेद २२६ अन्वये असलेल्या विशेष अधिकारांतर्गत फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३ अन्वये आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हवे तर हायकोर्ट आवश्यक त्या अटी घालून गोस्वामींची सुटका करू शकते , असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी गोस्वामीच्यावतीने केला. अलिबागच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात प्रथमदर्शनी जे निरीक्षण नोंदवले आहे. त्याचा आधार घेऊन हायकोर्ट गोस्वामी यांच्या सुटकेचा आदेश तात्काळ काढू शकते, असेही साळवे यांनी नमूद केले. मात्र न्यायालयाने आज कोणताही आदेश न देता उद्या ११ वाजता सुनावणी होईल असे सांगितले.