Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffect : कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून शेजाऱ्यांना मारहाण

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिकच्या अंबड पोलीस  ठाण्याच्या हद्दीत करोनाबाधित असल्याच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या कुटुंबास शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार सिडकोतील महाराणा प्रताप चौक येथे घडला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली आहे. या धक्कादायक प्रकाराची अधिक माहिती अशी की, येथील महाले फार्म येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस शेजारील आप्पा मोतीराम बच्छाव यांच्यासह त्यांची दोन मुले निशांत व प्रशांत आणि दोन्ही सुनांनी ‘तुम्ही करोना पॉझिटिव्ह असताना येथे कसे राहतात’, असा आरोप करीत शिवीगाळ करून मारहाण केली. ‘तुम्ही येथे राहतातच कसे, तेच बघतो’, अशी दमदाटी केली. याप्रसंगी  फिर्यादी व्यक्तीच्या डोळ्यावर फरशीच्या तुकड्याने दुखापत केली. हा वाद सोडविण्यास संबंधिताचा मुलगा गेला असता, त्यालाही मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बेडवाल करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक केली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!