AurangabadAccidentUpdate : हायवाच्या धडकेत प्लंबर ठार, ट्रक चालक फरार

औरंगाबाद -साजापूर फाट्याजवळ आज दुपारी दीड वा.लासुरकडे जाणार्या हायवा ट्रकशी विरुध्द दिशेने येणार्या मोटरसायकलशी जोरदार धडक झाल्यामुळे प्लंबर ठार झाला या प्रकरणी एम.वाळूज पोलिस ठाण्यात प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल सोनाजी नरोडे(२१) रा.सिंदोनबिदोन हा त्याच्या मित्रासोबत मंगळवारी दुपारी दीड वा. शहराकडे येत असतांना अपघात झाला.हायवाचालक फरार झाला आहे.ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.पुढील तपास पोलिसनिरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत गंभीरराव आणि पोलिस कर्मचारी अतरप करंत आहेत.