कोरोनाच्या समाप्तीसाठी हनुमान चालीसा करा, राम लल्लाची आरती करून घरात दीप लावा : खा . प्रज्ञा ठाकूर यांचा सल्ला

आइए हम सब मिलकर कोरोना महामारी को समाप्त करने के लिए लोगों के अच्छे स्वास्थ्य की कामना के लिए एक आध्यात्मिक प्रयास करें आज25 से 5 अगस्त तक प्रतिदिन शाम 7:00 बजे अपने घरों में हनुमान चालीसा का 5 बार पाठकरें5 अगस्त को अनुष्ठान का रामलला की आरती के साथ घरों में दीप जलाकर समापन करें pic.twitter.com/Ba0J2KrkA8
— Sadhvi Pragya Singh Thakur (@sadhvipragyag) July 25, 2020
देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना सरकारकडून करण्यात येत असल्या तरी भाजप नेत्या खा. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोरोना नष्ट करण्याचा उपाय सुचवला आहे. आपल्या ट्वीटमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून म्हणजे 25 जुलै ते 5 ऑगस्ट दररोज सायंकाळी 7 वाजता घरात हनुमान चालीसाचे पठण करा. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती केल्यानंतर घरात दिवा लावून समारोप करूया’.