AurangabadUpdate : निशांत चंद्रमोरे आणि अभिजित कुरेकर या दोन आर्किटेक्टचा तलावात बुडून मृत्यू

दिवंगत अभिजित कुरेकर
औरंगाबाद – कुटुंब आणि मित्र परिवारासहित चौका परिसरातील सारोळा भागात पार्टी करण्यासाठी आलेले दोन आर्किटेक्ट आज संध्याकाळी ५वा. तलावात बुडुन मरण पावले. निशांत चंद्रमोरेआणि अभिजित कुरेकर अशी मयतांची नावे आहेत. निशांत हा दिवंगत आयएफएस अधिकारी ओमप्रकाश चांद्रमोरे यांचे चिरंजीव आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रेमसागर चांद्रमोरे यांचे पुतणे होते.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , निशांत चंद्रमोरे यांच्या नवीन रिसोर्ट चे काम सारोळा परिसरात सुरु आहे. ते बघण्यासाठी चंद्रमोरे आणि कुरेकर हे आपल्या बायका आणि मुलांसहित व अन्य दोन ते तीन मित्रासहित सारोळा परिसरात आले होते. दुपारी जेवणे झाल्यानंतर दोघेही संध्याकाळी साडेचार वा. त्यांच्या तलावात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी उतरले परंतु बोट पाण्यात उलटली त्यावेळी निशांत चंद्रमोरे तलावाच्या बाहेर होते बोट उलटताच त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नांत अभिजित कुरेकर यांच्यासोबत त्यांचाही मृत्यू झाला तर अभिजित बरोबर बोटामध्ये बुडणारा मित्र मात्र वाचला. तलावाच्या बाहेर असणाऱ्या निशात आणि अभिजीतच्या परिवाराचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले खरे पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
फुलंब्री पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि नागरिकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह फुलंब्री प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत . उद्या शवविविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली मृतदेह करण्यात येतील अशी माहिती पोलिसनिरीक्षक संग्रामसिंग राजपूत आणि निशांतच्या कुटुंबीयांनी दिली . या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे